
बेटावर पर्यटक
ल्हानपणीची शाळा आठवणीचा अखंड स्त्रोत आहे
तिथून एक यात्रा सुरू होते जशी एका नदीची यात्रा
जिला पुढे जाऊन गढूळ क्षीण आणि कोरडं होऊन जायचय
तरीही जिच्यावर कोसळत राहील नेहमी समुद्राचं पाणी
ल्हानपणीच्या शाळेची इमारत पावसाच्या पाण्याने भिजून जाते
तुझ्या माथ्यावर छ्त्री आहे की निर्विघ्न सुखरूप पोचशील
आईजवळ शाळेतून घरी
खूप यात्रा ज्या पार पडल्यात आणि ज्या पार पडायच्यात
आईच्या गर्भातून नाही शाळेतून सुरू झाल्या होत्या
पोरगं ल्हानपणीच्या शाळेच्या बाकड्यावर बसता बसता बसून जाईल
फ़ळ्यावर जीवनाचा पहिला पाठ लिहिलेला
लिहून घेईल पोरगं जीवनाचा पहिला पाठ आपल्या पाटीवर
आणि मास्तरची नज़र चुकवून थुंकीनं पुसुन दॆखील टाकील
शाळेच्या मुतारीतून उठणारा अमर मुताचा वास
फ़ाऱ्या आणि गोणपाटाच्या वासा सोबत
रक्तात घमघमतोय
गृहपाठ न करता आल्यावर मिळणाऱ्या कठोर शिक्षांनी
आम्ही भविष्यातील शिक्षांसाठी सज्ज झालो
आता एक वावटळ येते त्या दिशेने
जिकडे ल्हानपणीची शाळा होती
एक अकाली वृद्ध झालेला मित्र सांगतो
की संतोष चौहान वेडा झाला
मी विचार करतोय किंवा विचार करतोय की विचार करतोय की
ज्या वर्गमित्राचं हस्ताक्षर एवढं सुंदर होतं
तो वेडा कसा झाला
हे वाक्य कवितेत अशाप्रकारे आलं आहे की
ज्याचं हस्ताक्षर एवढं सुंदर होतं त्याला वेडं व्हावच लागणार होतं
त्याच्या वेडं होण्याची समकालीन खबर आणि
सुदुर वसलेल्या आश्चर्यकारक हस्ताक्षराच्या दरम्यान
शाळेच्या वर्गांच्या रहस्यांची नदी दररोज सुकत जाते
आमच्या ल्हानपणीची हिन्दी माध्यमाची बे दुणे चार वाली शाळा
ह्या चमचमत्या काळात आता गरीबांची शाळा आहे
जसे समुद्र घोंघावतात
तसा जीवनाचा गदारोळ उठतो
शाळा स्मृतीचं बेट आहे
आता तिथं पर्यटक होउन कधी कधी जाणं होतं
...........व्योमेश शुक्ल.... ( शिरीष मौर्य साठी )
(हिन्दीवरून अनुवाद:श्रीधर नांदेडकर )
व्योमेश शुक्ल आणि शिरीष मौर्य हे दोन्ही माझे मित्र आहेत । खूप सुन्दर कविता लिहितात । श्रीधर नान्देड़करांचा हा अनुवाद आवळला । सभी को बहुत बहुत बधाई ।
ReplyDeleteEk samruddha dalan ughada karun dilyabaddal kitee aabhar manu asa zalay. Aamachya vachanachya, chintanachya aani srujanachaya kaksha vistarnyas nischitach madat hoeil. Yomesh shukla purna aanuvadit vhava hich aapeksha.Yomesh great aahech pan aanuvadanehi yogya nyay dilay. Dhanyawad.
ReplyDeleteBHASKAR NIRMAL-PATIL